कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी व त्यांचे कर्तव्य :


अ) अध्यक्ष -

१) सभा बोलविणे.

२) सभेचे अध्यक्ष म्हणून संचालन करणे.

३) संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार स्वत:च्या व सेक्रेटरी किवा खजिनदार यांच्या सहीने करणे व संस्थेची स्थावर मिळकत विकत घेणे,

    अथवा विकणे साठी संस्थेच्या वतीने सही करणे.

४) संस्थेच्या सर्व धोरणात्मक निर्णयामध्ये सहभागी असणे.


ब) कार्याध्यक्ष-

अध्यक्षाच्या गैरहजेरीत आर्थिक व्यवहार व्यतिरिक्त अध्यक्षांची इतर सर्व काम करणे .


क) उपाध्यक्ष -

अध्यक्ष व कार्याध्यक्षाच्या गैरहजेरीत अर्धिक व्यवहार व्यतिरिक्त अध्यक्षांची इतर सर्व कामे करणे.


ड) सेक्रेटरी -

१) संस्थेचा पत्रव्यवहार करणे.

२) संस्थेचा हिशोब ठेवणे व त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे इ.चे रेकोर्ड ठेवणे.

३) सभा बोलाविणे,नियोजन करणेसाठी अध्याक्षंना मदत करणे.

४) संस्थेच्या कार्याची अमलबजावणी करणे.

५) संस्थेच्या कार्यवाह या भूमिकेतून सर्व कार्यक्रम योजना राबविणे.


इ) सहसेक्रेटरी -

सेक्रेटरीच्या गैरहजेरीत कामे करणे.


ई) खजिनदार -

संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा हिशोब ठेवणे.


उ) हिशोब तपासणीस -

प्रत्येक वर्ष अखेरीस संस्थेचे हिशोब तपासणे.