विश्र्वस्त पद रद्द्बातल होणे :

     एखादा विश्र्वस्त किवा पदाधिकारी याने विश्र्वस्त पदाचा राजीनामा दिल्यास,काही कारणाने महाराष्ट्र राज्य सोडून इतरत्र

वास्तव्यात गेल्यास,किंवा परदेशी वास्तव्य करण्यास गेल्यास,किंवा दिवंगत झाल्यास किवा फौजदारी गुन्हाच आरोप शाबीत

झाल्यास,किंवा संस्थेच्या हिताविरुध्द त्याने वर्तन केल्यास त्याचे विश्र्वस्त पद रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला राहील व

त्या रिक्त होणा-या जागेवर नवीन विश्र्वस्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहील.

विश्र्वस्तांचा मेहनताना :

     संस्थेच्या कार्यकारी मंडळाने कोणत्याही मेहनताना मोबदला घ्यायचा नाही.प्रवासखर्च व इतर आवश्यक खर्च मात्र कार्यकारी

मंडळाच्या ठरावाप्रमाणे घ्यावा.

बँक खाते :

     संस्थेची रोख रक्कम संस्थेच्या नावाने उघडलेल्या बँक खात्यामध्ये जमा करावी व या खात्याचा व्यवहार अध्यक्ष,सेक्रेटरी किंवा

खजिनदार यांपैकी दोघांच्या संयुक्त सही मार्फत होईल,मात्र त्यासाठी अध्यक्षाची सही अनिवार्य असेल.

घटना दुरुस्ती :

     वरील नियमावलीत,घटनेत बदल करावयाचा झाल्यास कार्यकारी मंडळाच्या बहुमताने बदल करता येईल व असा बदल व दुरुस्ती

सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यानंतरच त्याची अंमल बजावणी केली जाईल .

देणग्या स्विकारणे :

     संस्थेच्या कार्यकारी मंडळाला संस्थेचे उद्देश पार पडण्यासाठी ,अनुदान व देणग्या गोळा करण्याचा अधिकार राहील.

संस्थेचे विसर्जन :

     संस्था नोंदणी अधिनियम १८६० चे कलम १३ व १४ (अ) नुसार करता येईल.