प्रस्तावना :
राष्ट्रीय रेड्डी (यलम) संस्थेची स्थापना १९८९ साली झाली.
समाजातील अनेक जात समूहापैकी यलम ही एक जात आहे.यलम ही जात महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर पसरलेल्या मराठवाड्यात विशेषत:लातूर जिल्हा व आसपासच्या परिसरात यलम जात आढळणे या जातीची लोकसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात 4 लाखापेक्षा जास्त अहेत.
आंध्रप्रदेश व कर्नाटक सीमावर्ती भागात यलम,समाज आहे तेथील समाज यलम रेड्डी ही उपाधी लावतात त्यामुळे या जातसमूहाला रेड्डी नावाने (जातीने) ही ओळखले जाते.
यलम समाजाच्या उपसंस्था मुंबई,औरंगाबाद,नगर,आळंदी,पंढरपूर यथे आहेत.
यलम समाज :
यलम ही जात आंध्रप्रदेशातून स्थलांतरीत झालेली शेतकऱ्यांची जमात आहे.वेली या तेलगु शब्दाचा अर्थ शेती असा व वेलमा म्हणजे शेतकरी. वेलमा - येलमा - यलम असा शाब्दिक अपभ्रश होऊन यलम हा शब्द तयार झाला.हि जात शुद्र वर्गात गणली जात असे हि जमात महाराष्ट्रात मराठवाडा विभागात विशेषत: दक्षिण मराठवाड्यात दिसते आंध्रप्रदेशातून शेती व्यवसाय करण्यासाठी स्थलांतरीत होवून महाराष्ट्रातील मराठवाड्यात स्थायिक झाली.यलम समाजाच्या साडेसात उपजाती मानल्या जातात त्यात पाकनाटे गोमाले,गुरुडी,चीटपले,गोलावर,मोटाडे,पिचकुटले,या उपजाती आहेत.
यलम समाजाचे वास्तव्य :
मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद,या जिल्हयात एकून समाजाच्या 80 % पेक्षा जास्ती लोक येथे वास्तव्य करतात त्याच बरोबर बार्शी, श्रीरामपूर, गंगाखेड, पंढरपूर, येथेही काही गावात तुरळक वस्ती आहेत.तसेंच मुंबई, औरंगाबाद, पुणे, ठाणे येथे नोकरी व्यावसायानिम्मित स्थायिक लोक आहेत. जगातील काही देशामध्ये ही अल्पप्रमाणात यलम समाजातील तरुण वर्ग नोकरी व्यवसायानिम्मित स्थायिक होऊ लागला अहे.
यलम समाजाचे सामाजिक जीवन :
महाराष्ट्रातील यलम समाजाचे सामाजिक जीवन इतर समाजातील जातीशी मिळत जुळते असून स्वजाती व इतर जातीशी एकोप्याने व प्रेमाने राहणारा समाज आहे.या जातीत उच्च प्रकार नसून सर्वांचे सामाजिक जीवन सारखेच आहे.
यलम समाजाचे धार्मिक जीवन :
यलम समाज हा पूर्णपणे हिंदू धर्म व त्याचे रीतीरिवाज पाहणारा आहे. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथ शास्त्र पुराणावर श्रध्दा ठेवून आचरण करणारा समाज आहे.यलम समाज हा वारकरी संप्रदायला मानणारा असल्यामुळे बहुतेकांचे कुलदैवत पंढरपूरचा पांडुरंग हेच आहे. आषाढी,कार्तिकी एकादशीला दिंडी सोबत अनेक समाज बांधव जाताना दिसतात त्याच बरोबर नरसिह,विठोबा,खंडोबा,ज्योतिबा,मशाम्मा,पोचम्मा,खोकलेम्मा इ.हि कुलदैवत आहेत .
संस्थेचा उद्देश :
१) समाजात शैक्षणिक, सांस्कृतिक, शारीरिक, नैतिक, ओद्योगिक, शीक्षणाचा प्रसार करणे, शिक्षण देणे.
२) समाजाची सर्वांगीण उन्नती करणे.
पूर्ण वाचा.
सभासदत्वासांठी नियम :
सभासद हा त्या त्या विभागातील कायम रहिवाशी असला पाहिजे. व त्याने तो रहिवाशी असलेल्या विभागतच सभासद नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच एका विभागामधून संस्थेचे सभासदत्व मिळविल्यानंतर अन्य ठिकाणी सभासदत्वासाठी नोंदणी अर्ज करता येणार नाही.व असे सभासदत्व कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही.
वयाच्या 18 वर्षावरील येलम / रेड्डी समाजातील कोणत्याही व्यक्तीस रुपये ५००० /- (रुपये पाच हजार कातर ) भरून सभासदत्वासाठी संस्थेच्या कार्याकारीनिकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल.पंढरपूर व औरंगाबाद विभागातील सभासद अर्ज तेथील उपसमितीच्या शिफारशीसह मुख्य कार्याकारीनिकडे पाठविण्यात येतील.सर्व सभासदांच्या अर्जावर निर्णय घेण्याचा अधिकार मुख्य कार्यकारिणीला असेल.
सन्माननीय सभासदत्व - समाजातील मान्यवर व्यक्तीस असे सभासदत्व देता येईल पण त्यांना मतदान करता येणार नाही . कार्यकारी मंडळासाठी निवडणूक लढविता येणार नाही. परंतू सन्माननीय सभासदांनी दिलेला सल्ला कार्यकारिणी विचारात घेवू शकते .
संस्थेबद्दल :
एखादा विश्र्वस्त किंवा पदाधिकारी याने विश्र्वस्त पदाचा राजीनामा दिल्यास,काही कारणाने महाराष्ट्र राज्य सोडून इतरत्र वास्तव्यात गेल्यास,किंवा परदेशी वास्तव्य करण्यास गेल्यास,किंवा दिवंगत झाल्यास किंवा फौजदारी गुन्हाच आरोप शबीत झाल्यास,किंवा संस्थेच्या हिताविरुध्द त्याने वर्तन केल्यास त्याचे विश्र्वस्त पद रद्द करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला राहील व त्या रिक्त होणा-या जागेवर नवीन विश्र्वस्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहील.
पूर्ण वाचा.